गीता जर तुमच्या घरात असेल तर या चुका करु नका...

भगवद् गीता घरात ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. भगवद् गीतेचे रोज वाचन केल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.

जीवनातील समस्या सुटतात

जीवनातील सर्व समस्यांची उत्तरं भगवद् गीतेमध्ये मिळतात. जे लोक भगवद् गीतेच्या विचारांचं अनुकरण करतात त्यांना प्रगती आणि शांतता मिळतात.

श्रीकृष्णांची कृपा राहते

ज्या घरात भगवद् गीतेची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी आणि भगवान श्रीकृष्णांची कृपा असते, अशी मान्यता आहे.

घरात भगवद् गीता ठेवण्याचे नियम

भगवद् गीता घरात ठेवण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. गीता नेहमी स्वच्छ जागी ठेवावी.

असा करा पाठ

अंघोळ न करता भगवद् गीतेला हात लावण अशुभ मानल जातं. त्यामुळे आर्थिक तणाव वाढतो.

वाचनाचे नियम

भगवद् गीता जमिनीवर ठेवण वर्ज्य मानल जातं. ती पूजेचा पाट किंवा चौरंगावर ठेवून वाचावी.

स्वत:च्या आसनावर बसा

भगवद् गीता वाचताना स्वत:च्या आसनावर बसावं. दुसऱ्यांच्या आसनावर बसल्यास वाचनाचा प्रभाव कमी होतो.

पाठ सुरु करण्याचे नियम

भगवद् गीता पाठ सुरु करण्यापूर्वी श्रीगणेश आणि श्रीकृष्णांचं स्मरण करावं.

जीवनाच सार

भगवद् गीता आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवतो. गीतेचं वाचन केल्याने जीवनात प्रगती, शांती आणि समृद्धी लाभते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story