वडील गृहमंत्री, लेक ICC अध्यक्ष; जय शहा यांची संपत्ती किती?

Saurabh Talekar
Aug 27,2024

जय शहा

बीसीसीआय सचिव जय शहा यांची आयसीसी अध्यक्षपदी निवड झाली आहे. जय शहा सर्वात तरुण अध्यक्ष ठरलेत.

जन्म

जय शहा यांचा जन्म 22 सप्टेंबर 1988 रोजी झाला आणि जय शहा एक भारतीय उद्योगपती आणि क्रिकेट प्रशासक आहेत.

शिक्षण

जय शाह यांनी गुजरातमधून शिक्षण घेतले आहे. बारावीनंतर निरमा विद्यापीठातून बी.टेक.ची पदवी घेतली.

गुजरात क्रिकेट

2013 मध्ये जय शहा गुजरात क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव झाले अन् क्रिकेट प्रशासक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.

बीसीसीआय सचिव

2019 मध्ये जय शहा यांना बीसीसीआयचे सचिव झाले अन् भारतीय क्रिकेट बोर्डाला नवी उभारी दिली.

संपत्ती

जय शहा यांची एकूण संपत्ती 124 कोटी रुपये आहे. त्यांच्या व्यवसायातून त्यांना ही संपत्ती मिळाल्याचे सांगितलं जातं.

ऋषिता

जय शहा यांच्या पत्नीचे नाव ऋषिता आहे. दोघंही कॉलेजचे मित्र होते. ऋषिताच्या वडिलांचे नाव गुणवंतभाई पटेल असून ते व्यापारी आहेत.

दोन मुली

जय शाह यांनी 10 फेब्रुवारी 2015 रोजी ऋषिताशी लग्न केले आणि दोघांना दोन मुली आहेत.

वडील

जय शहा यांचे वडील भारतीय जनता पक्षाचे जिग्गज नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा आहेत.

VIEW ALL

Read Next Story