Black Thread : या 3 राशींच्या लोकांनी चूकनही घालू नये काळा धागा, होईल नुकसान

काळा धागा हा आपल्या संस्कृतीतील अनेक विधींपैकी एक आहे. असा समज आहे की, काळा धागा पायामध्ये परिधान केल्यानंतर तो वाईट नजरेपासून बचाव करतो.

असं मानलं जातं की, हा धागा आपल्या शरीराला नकारात्मक ऊर्जांपासून वाचवतो. हात, पाय किंवा गळ्यात काळा धागा लोक त्यांच्या संरक्षणासाठी वापरतात.

ज्योतिष शास्त्रानुसार, काही राशीच्या लोकांना काळा धागा ( Black Thread ) न घालण्याचा सल्ला दिला जातो.

काही राशींच्या व्यक्तींनी हातात किंवा पायात हा काळा धागा वापरू नये.

धनु राशीचा स्वामी बृहस्पती आहे. याचा ज्याचा रंग पिवळा आहे.

त्यामुळे धनू राशीच्या व्यक्तींना काळा धागा वापरण्याचा सल्ला दिला जात नाही.

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असून त्याचा रंग पांढरा आहे.

या राशीच्या व्यक्तींना काळ्या धाग्याऐवजी पांढरा धागा वापरावा. काळा धाग्याचा वापर केल्याने या राशीच्या लोकांच्या जीवनात अडचणी येण्याच्या शक्यता असतात.

मेष राशीचा स्वामी मंगळ असून त्याचा रंग लाल आहे.

मेष राशीच्या लोकांना काळ्या धाग्याऐवजी लाल धागा घालण्याचा सल्ला देण्यात येतो. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story