घरात तुटलेल्या-फुटलेल्या वस्तू ठेवताय; वास्तुशास्त्र काय सांगतं पाहा

तुम्हीपण घरात तुटलेली-फुटलेली भांडी ठेवता का. तर आत्ताच तुमची ही सवय बदला. कारण घरात खराब वस्तू ठेवणे चुकीचे असल्याचे वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.

घरात कोणत्या वस्तू ठेवू नयेत तसंच, त्यामुळं काय होऊ शकते हे आपण आज जाणून घेऊयात.

घरात फुटलेला बल्ब किंवा ट्यूब लाइट असेल तर आत्ताच फेकून द्या कारण त्यामुळं राहुशीसंबंधित समस्या निर्माण होऊ शकते

घरातील मुख्य स्थानी लाल स्वस्तिक लावा आणि घरात कचरा होणार नाही याची दक्षता घ्या

स्वयंपाकघरात किंवा बाथरुममध्ये गळका नळ असेल तर लगेचच तो ठिक करुन घ्या कारण घरात गळका नळ असल्यास नकारात्मक उर्जा येते.

घरात छोट्या छोट्या गोष्टीवरुन भांडणं होत असतील तर मंगळाची स्थिती योग्य नाहीये. घरात व्यवस्थित सूर्यप्रकाश पोहोचेल याची व्यवस्था करा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story