बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच त्यांचे लूक्स, कपडे यासाठी चर्चेत असतात.पण त्यांचे वैयक्तिक आयुष्यही लोकांच्या चर्चेचा विषय असते.

काही अभिनेत्रींबद्दल तर चक्क त्या प्रेग्नंट असल्याच्याही बातम्या पसरतात. चला तर पाहूया कोणत्या अभिनेत्रींबद्दल अश्या अफवा पसरल्या आहेत.

जिनिलिया डिसूझा

काही दिवसांपूर्वी एका व्हिडिओत जिनिलियानं तिच्या पोटाला हात लावल्यानं प्रेग्नंसीच्या अफवांना उत आला होता. तिचा पती रितेशनं मात्र हे सपशेल खोटं असल्याचं त्याच्या सोशल मीडिया वर सांगितलं.

कटरिना कैफ

विकी कौशल सोबत लग्न झाल्यापासूनच अभिनेत्री प्रेग्नंसीच्या अफवांना सामोरी जात आहे. पण तिनं मात्र या अफवांवर मौन धरलं आहे.

कियारा अडवाणी

कटरिनासारखंच कियारालाही लग्नानंतर प्रेग्नंसीच्या अफवांना सामोरं जावं लागलं.

करीना कपूर खान

करीनानं सोशल मीडिया वर पोस्ट केलेल्या एका फोटोत तिचं पोट दिसल्यानं तिच्याबद्दल प्रेग्नंसीच्या अफवांना उधाण आलं होतं.

अंकिता लोखंडे

टेलिविजन अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या गोवा वेकेशनचे फोटोज वायरल झाल्यानंतर तिच्या प्रेग्नंसीबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले गेले. पण अंकितानं या अफवा खोट्या असल्याचं सांगितलं.

VIEW ALL

Read Next Story