बुध दोष असेल तर व्यक्ती कर्जात बुडतो

'या' उपायातून मिळेल दिलासा

ग्रहांची स्थिती

ज्योतिषशास्त्रानुसार सर्व नऊ ग्रहांचा आपल्या जीवनावर प्रभाव असतो. जर कुंडलीत ग्रह शुभ स्थितीत असतील तर व्यक्तीच्या जीवनात धन, सुख, शांती आणि समृद्धीची कमतरता नसते.

समस्या वाढतात

दुसरीकडे ग्रहांची स्थिती खराब असेल तर व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

बुध गोचर

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 7 जून रोजी संध्याकाळी 7.40 वाजता ग्रहांचा राजकुमार बुध वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या गोचरमुळे काही राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होताना दिसू शकतो.

अशुभ स्थितीत असेल तर

बुध ग्रह हा शुभ ग्रह मानला जातो. परंतु बुध ग्रह इतर कोणत्याही अशुभ ग्रहासोबत आल्यास अशुभ फल देतो.

हे त्रास होतात

ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध दोष असतो त्यांना शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्याला प्रत्येक क्षेत्रात अपयश येते.

हे उपाय करा

कुंडलीत बुध कमजोर असेल तर त्याला मजबूत करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत.

रंगाचे कपडे घाला

बुधवारी हिरवे कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो. या दिवशी बुधाला प्रसन्न करण्यासाठी गाईला हिरवे गवतही खायला द्यावे. यामुळे बुध दोष कमी होईल.

या डाळीचं दान करा

बुधवारी हिरव्या मूग डाळीचे दान करावे. यासोबतच याचे सेवन केल्याने कुंडलीतील बुध ग्रहाची स्थिती मजबूत होते आणि दोष दूर होतात.

बुध मंत्राचा जाप करा

बुध ग्रहाचा बीज मंत्र 1008 वेळा जपण्याचा सल्ला दिला जातो. 'ॐ ब्रां ब्रीं ब्रौं सः बुधाय नमः!'या मंत्राचा जप केल्याने भगवान बुध लवकर प्रसन्न होतो आणि प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते.

गणपतीला हे अर्पण करा

शास्त्रानुसार बुधवारी गणपतीला लाडू आणि दुर्वा अर्पण केल्याने बुध दोष कमी होतो.

हे रत्न घाला

रत्न शास्त्रानुसार बुध ग्रह मजूबत करण्यासाठी पन्ना रत्न घालण्याचा सल्ला दिला जातो. पण हे लक्षात ठेवा की ते घालण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला घ्या. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story