आयुष्यात श्रीमंत होण्यासाठी प्रत्येकजण स्वप्न पाहत असतो. त्यासाठी दिवसरात्र प्रयत्न देखील लोक करतात.
मात्र, कठिण परिश्रमाशिवाय देखील लोकांना आयुष्यात यश मिळत नाही. त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही.
आचार्य चाणक्यांच्या मतानुसार, अशा काही गोष्टी आहे, ज्या लोकांना मागे खेचतात.
आचार्य चाणक्यांनी अशा काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यांना सोडून देणं गरजेचं आहे.
रात्री जेवण झाल्यानंतर खरकटे भांडे तसेच ठेऊ नये, त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते, असं आचार्य म्हणतात.
ज्या घरात महिलांचा अपमान होतो. तिथं माता लक्ष्मी निवास करत नाही, असंही चाणक्य नितीमध्ये सांगितलं आहे.
एखाद्याचा अपमान करणारा व्यक्ती, सतत अपशब्द बोलणारा व्यक्ती आयुष्यात यशस्वी होत नाही.
जो व्यक्ती अहंकारामध्ये असतो आणि दुसऱ्यांना धोका देतो, तो व्यक्ती आयुष्यात याच सवयीमुळे अपयशी होतो, असंही चाणक्य म्हणतात.
वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही