आचार्य चाणक्य यांच्या नितीनुसार, मनुष्याने कितीही प्रयत्न केले तरी काही गोष्टी त्यांच्या नशिबातच लिहलेल्या असतात.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जेव्हा एखादे बाळ आईच्या गर्भात वाढत असते तेव्हाच त्याच्या भाग्यात या गोष्टी लिहलेल्या असतात.
कोणत्याही व्यक्तीचे वय हे त्याच्या आईच्या गर्भात असतानाच लिहले जाते. म्हणूनच म्हटलं जातं की, कोणी कितीही संपत्ती कमवली तरी आयुष्य विकत घेऊ शकत नाही.
चाणक्य म्हणतात, मनुष्याने नेहमी कर्म केले पाहिजे. जे व्हायचे ते त्याच्या नशीबात आधीच लिहलेले असते. मनुष्याकडे असलेली धन-संपत्तीही त्याच्या भाग्यात आधीपासूनच लिहलेली असते.
चाणक्य यांच्यानुसार, कोणी कितीही ज्ञान घेतले तरी ते आधीपासूनच त्याच्या भाग्यात लिहलेले असते. कोणताही मनुष्य शक्ती व संपत्तीच्या जोरावर दुसऱ्याचे ज्ञान घेऊ शकत नाही
चाणक्य यांच्यानुसार, मृत्यूदेखील नशिबात आधीपासूनच लिहलेला असतो. त्यामुळंच मृत्यूला रोखणे अशक्य आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)