दुधासारख्या शुभ्र अशा चंद्रावर 'या' घटनेनंतर पडले काळे डाग?
Aug 22,2023
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा आणि पाण्याचा करक मानला जातो. चंद्र 27 नक्षत्रांचा स्वामी तर 16 कलांमध्ये निपुण आहे. पण एकेकाळी दुधासारखा पांढरा असलेल्या चंद्रावर डाग का पडले.
पौराणिक कथेनुसार, सतीच्या आत्मदहनानंतर, शिवाने सतीचे वडील राजा दक्ष यांना यासाठी जबाबदार धरलं आणि त्यांना मारण्यासाठी ते निघाले होते.
जेव्हा शिवाने दक्षावर बाण सोडला तेव्हा राजा दक्ष हरणाच्या रूपात चंद्रामध्ये लपला होता.
असं म्हणतात की हाच मृग चंद्रावर डाग असल्यासारखा दिसतो. शास्त्रानुसार चंद्राचं नाव देखील मृगांक आहे.
चंद्रावर काळे डाग आहेत कारण चंद्रावर असलेल्या खड्यांची सावली मोठ्या प्रमाणात पडते आणि परिणामतः ते चंद्रावर काळे डाग असल्यासारखे वाटतात. असं इस्त्रोकडून सांगण्यात आलं आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही