तांब्याचा सूर्य घरात ठेवल्याने होतात 'हे' फायदे

Jun 10,2024

तांबं या धातूचे असंख्य फायदे

आयुर्वेदात तांबं या धातूचे असंख्य फायदे सांगितले जातात. तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याची सवय शरीराला फायदेशीर ठरतं.

वास्तूशास्त्र

आयुर्वेदाप्रमाणे वास्तूशास्त्रातही तांब्याच्या धातूला महत्त्व दिलं जातं.

सकारात्मक ऊर्जा

असं म्हटलं जातं की, तांब्याचा सूर्य भिंतीवर पूर्व दिशेला लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.

सतत भांडणं

हिंदू शास्त्रानुसार जर घरात सतत भांडणं होत असतील तर तांब्याचा सूर्य घरात लावल्याने त्याचा चांगला परिणाम होतो.

वास्तूदोष

वास्तुशास्त्रानुसार तांब्याचा सूर्य घराच्या पूर्वेला लावल्यास वास्तूदोष दूर होण्यास मदत होते.

अनावश्यक खर्च

जर घरात विनाकारण पैसे खर्च होत असतील तर तांब्याचा सूर्य घरात लावल्यास अनावश्यक खर्च आटोक्यात येतील.

तांब्याच्या सूर्याची पुजा

तुमच्या कुंडलीत सूर्याची दिशा खराब असेल तर सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी तांब्याच्या सूर्याची पुजा करू शकता. असं ज्योतिषशास्त्रात सांगीतलं जातं. (वरील माहिती सामान्य संदर्भावर आधारित असून, झी 24तास अशा कोणत्याही माहितीची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story