Dev Deepawali 2024 : देव दिवाळीला तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस, 'या' 5 जागा दिवा नक्की लावा
कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी करण्यात येते. यादिवशी तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस असतो. यादिवशी दिवे लावणे अतिशय शुभ मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार, घरामधील तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी नांदते.
आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी घराच्या मुख्य द्वारावर दिवे लावल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो.
देव दिवाळीला देव्हाऱ्यात दिवा लावल्याने घरात शांती आणि सकारात्मकता वाढते.
घरात अन्नपूर्णेचा वास राहावा म्हणून स्वयंपाकघरात दिवा लावावा.
या दिवशी अंगणात दिवा लावल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते. शिवाय घरावर धनवर्षा होते.
संध्याकाळी 5:10 ते 7:47 पर्यंत शुभ मुहूर्तावर दिवा लावणे खूप शुभ मानले जाते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)