Dhruva Yoga मुळे 5 राशींवर शनिदेवाची कृपा

घरात असणार लक्ष्मीचा वास


शनिवार हा शनिदेवाची पूजा करण्याचा दिवस असून पंचांगानुसार ध्रुव योग जुळून आला आहे. त्यामुळे 5 राशींवर शनिदेवाची कृपा बरसणार आहे. या लोकांना धनलाभ होणार आहे.

मेष (Aries Zodiac)

घरात अनेपक्षित पाहुणे येणार आहे. वडिलोपार्जित व्यवसायातून फायदा होईल. तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. उपाय - शनिवारी शनियंत्राची स्थापना करा आणि शनि चालिसाचा पाठ करा.

मिथुन (Gemini Zodiac)

या लोकांची समस्या दूर होतील. मन प्रसन्न राहील. मेहनतीचं फळं मिळणार. व्यवसायात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. वैवाहिक जीवनात आनंद असेल. उपाय - शनिवारी पीठ, काळे तीळ आणि साखर मिसळून मुंग्यांना खायला द्या.

तूळ (Libra Zodiac)

व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. व्यवसायातून प्रगती होईल. आर्थिक लाभ होईल. पालकांसोबत धार्मिक स्थळी जाण्याचे योग आहेत. उपाय - शनि मंदिरात मोहरीच्या तेलात सावली दान करा.

कुंभ (Aquarius Zodiac)

अडकलेला पैसा परत मिळणार आहे. भावासोबत झालेला मतभेद संपेल. जोडीदारासोबत मालमत्ता खरेदी कराल. चांगली बातमी मिळार आहे. उपाय - पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करु चारमुखी दिवा लावा.

मीन (Pisces Zodiac)

व्यवसाय विस्तारणार आहे. नोकदार वर्गाला लाभ होणार आहे. वडिलांचे सहकार्य लाभेल. अडकलेला पैसा परत मिळेल. मन प्रसन्न असेल. उपाय - शनिवारी काळे कपडे, लोखंडी भांडी, उदीद डाळ दान करा. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story