एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीय आठवण म्हणून त्याचे कपडे तसेच इतर वस्तू जपून ठेवतात.
कुटुंबातील सदस्य अथवा जवळचे व्यक्ती मृत व्यक्तींच्या वस्तू आठवण म्हणून वापरतात देखील.
मृत व्यक्तीच्या काही वस्तू वापरु नयेत असं गरुड पुराणात सांगण्यात आलेय.
मृत व्यक्तीचे कपडे कुटुंबीयांनी घरात ठेवू नयेत तर ते दान करावेत. मृत व्यक्तीचे कपडे वापरणं योग्य नाही. कारण असे कपडे वापरल्यास संबंधित जिवंत व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक आजार होऊ शकतात.
मृत व्यक्तीचे कपडे वापरल्याने जिवंत व्यक्ती मृत व्यक्तीशी जोडली जाते. त्याला मृत व्यक्तीची सतत आठवण येऊ लागते. याचा परिणाम जिवंत व्यक्तीचं शरीर आणि मानसिकतेवर होतो.
मृत व्यक्तीचे घड्याळ वापरु नये. कारण घडाळ्यात मृत व्यक्तीची नकारत्मकता असते. यामुळे घड्याळ घालणाऱ्यांवर नकारात्मक परिणाम होते.
मृत व्यक्तीचा दागिने परिधान करु नयेत. यामुळे मृत व्यक्तीचा भास होत राहतो.