माघ महिन्यात चुकूनही खरेदी करु नका 'या' वस्तू!

धार्मिक शास्त्रात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात कुठल्या गोष्टी करु नये किंवा कुठल्या गोष्टी कराव्यात याबद्दल शास्त्रात सांगण्यात आलं आहे. या गोष्टींचं पालन केल्यास घरात सुख समृद्धी नांदते असं म्हटलं जातं.

माघ महिन्यात श्रीकृष्णाची पूजा केली जाते. माघ महिन्यात पवित्र नदीत स्नान केल्याने विशेष फळ मिळतात असं म्हटलं जातं.

माघ महिन्यात खालील गोष्टी केल्यास आयुष्यभर कष्ट आणि विविध अडचणींचा सामना करावा लागतो.

माघ महिन्यात श्रीकृष्णाला तीळ अर्पण करावे. मात्र माघ महिन्यात चुकूनही तीळ खरेदी करु नयेत.

चांदीचा संबंध हा चंद्रदेवाशी असल्याने माघ महिन्यात चांदीची नाणी आणि चांदीची भांडी खरेदी करु नयेत.

याशिवाय माघ महिन्यात पितळेची भांडी खरेदी करू नयेत.

मुळा, कोथिंबीर, मद्य आणि मांसचं सेवन करु नये. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story