वर्षभरात या व्यक्तीला भलीमोठी रक्कम मिळणार

मायक्रोसॉफ्टचे माजी व्यवस्थापकीय संचालक स्टीव्ह बाल्मर यांना 2024 मध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून एक अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 8300 कोटी रुपये मिळणार आहेत.

पण तुम्हाला माहिती आहे का स्टीव्ह बाल्मर कोण आहेत? स्टीव्ह बाल्मर हे जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहे. इतकंच नव्हे तर बाल्मर हे मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ या पदावर कार्यरत होते.

सध्या बाल्मर मायक्रोसोफ्ट मध्ये कोणत्याही प्रकारचं काम करत नाहीयेत. पण त्यांच्याकडे मायक्रोसॉफ्टचे कोट्यावधींचे शेअर्स आहेत. त्यांना 2024 या वर्षात एक अब्ज डॉलर्स म्हणजेच 8300 कोटी रुपये मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून मिळणार आहेत.

मायक्रोसॉफ्टचे माजी व्यवस्थापकीय संचालक असलेल्या बाल्मर यांच्याकडे मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे जवळपास 333.2 डॉलर्सचे शेअर्स आहेत जे कंपनीच्या चार टक्के मालकी इतके आहेत.

1980 मध्ये स्टीव्ह बाल्मर हे मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून रुजू झाले आणि हळूहळू 2014 पर्यंत व्यवस्थापकीय संचालक होऊन ते या पदावरून निवृत्त झाले.

2014 मध्ये स्टीव्ह बाल्मर यांनी त्यांच्या सीईओ पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी कंपनीतून घेतलेले शेअर्स उघड केले होते. ते शेअर्स कंपनीच्या सुमारे चार टक्के होते. गेल्या वर्षी त्यांच्या स्टॉकची किंमत 86 अब्ज डॉलर होती.

पण गेल्या वर्षी मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या शेअर्समध्ये 56 टक्क्यांनी वाढ झाली आणि यामुळे बाल्मर यांच्या शेअरची किंमत 130 अब्ज डॉलर इतकी झाली आहे.

स्टीव्ह बाल्मर यांना एक अब्ज डॉलर्स म्हणजे 8300 कोटी रुपये मिळाल्यानंतर त्यांना त्यातून 20 टक्के दराने म्हणजे 200 दशलक्ष डॉलर कर भरावा लागेल. सध्या स्टीव्ह बाल्मर हे बाल्मर ग्रुपचे सहसंस्थापक आहेत. (सर्व फोटो - AP)

VIEW ALL

Read Next Story