रावणाच्या पायाखाली निळ्या रंगाचा तो मनुष्य आहे तरी कोण?

विजयादशमी

यंदाच्या वर्षी विजयादशमीचं पर्व 24 ऑक्टोबरला साजरं केलं जाणार आहे. हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो.

रावण

राक्षसांचा दैत्य असलेला रावण आपल्या शक्तीच्या सहाय्याने कोणालाही नियंत्रित करू शकत होता.

निळ्या रंगाची व्यक्ती

तुम्ही कधी रामायण लक्षपूर्वक पाहिलं असेल, तर तुम्हाला एक निळ्या रंगाची व्यक्ती रावणाच्या सिंहासनाजवळ दिसते.

न्यायाचा देव

रामायणात रावणाच्या पायाखाली दिसणारा निळ्या रंगाचा माणूस हा न्यायाचा देव म्हणजेच शनि असल्याचं शास्त्रातील तज्ज्ञ सांगतात.

मायावी राक्षस

पौराणिक कथेनुसार रावण हा मायावी राक्षस होता. तंत्र-मंत्रातील त्यांच्या कर्तृत्वानं तो एक महान ज्योतिषी बनला होता.

ग्रहांना कैद

कुंडलीतील ग्रहांची स्थिती नियंत्रित करण्यासाठी रावणाने सर्व ग्रहांना कैद केले होते, असं म्हटलं जातं.

पायाखाली ठेवलं

कुंडलीत सर्व ग्रह रावणाच्या नियंत्रणात होते. मात्र, शनी नेहमी आपली जागा बदलत होता. त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी रावणाने शनिला पायाखाली ठेवलं होतं, असं शास्त्रात सांगण्यात आलंय.

मुक्त कसं केलं?

सीतेला रामाचा निरोप घेऊन हनुमान लंकेत गेला तेव्हा, लंका दहनाच्या वेळी हनुमानाने शनिदेवाला रावणाच्या तावडीतून मुक्त केलं होतं.

VIEW ALL

Read Next Story