गणपतीला आवडत नाहीत 'या' 4 वस्तू, चुकूनही करू नका अर्पण

गणपती बप्पाची आराधना केल्याने सगळी संकटे, दुखः नाहीसे होतात. म्हणून त्याला विघ्नहर्ता म्हणतात.

यावेळी मोदक, दुर्वा, जास्वंदीचे फुल अशा बाप्पाला आवडणाऱ्या गोष्टी अर्पण केल्या जातात.

पण तुम्हाला माहिती आहे का? अशा काही वस्तू आहेत ज्या गणपतीला वाहिल्याने तुमची पूजा निष्फळ ठरू शकते आणि त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो.

तुळस

गणपतीला तुळस अजिबात आवडत नाही. त्यामुळे तुळस अर्पण केल्यास बाप्पा नाराज होऊ शकतो.

केतकीचे फुल

गणपती बाप्पाला केतकीचे फुल आवडत नाही. त्यामुळे चुकूनही गणपतीला केतकीचे फुल वाहू नका.

तुटलेला तांदूळ

पुजा करताना अक्षता वाहिल्या जातात. पण गणपतीला चुकूनही तुटलेल्या अक्षता किंवा तांदूळ वाहू नका त्याने भगवान नाराज होऊ शकतात.

पांढऱ्या वस्तू

एकदा चंद्राने गणेशाची विटंबना केली होती, तेव्हा गणपती बाप्पांनी त्याला श्राप दिला होता अशी मान्याता आहे.

त्यामुळे चंद्रासंबंधीत वस्तू म्हणजे पांढरे फुल, वस्त्र, पांढरा धागा अशा वस्तू अर्पण केल्यास तुमची पुजा निष्फळ होऊ शकते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story