गरुड पुराणानुसार, नरक लोक पृथ्वीच्या खाली असतो. ज्याला अधोलोक असेही म्हणतात.
नगर त्रिलोकात असून दक्षिणेला पृथ्वीच्या खाली पाण्यावर वसलाय, असे सांगण्यात येते.
येथे सुर्यपुत्र पितृराज यम राहतात. ते दूतांनी आणलेल्या मृतकाला दंड देण्याचे काम करतात, असे गरुड पुराणात म्हटले जाते.
नरकाची लोकसंख्या 55 कोटींपेक्षा अधिक आहे. ज्यामध्ये 21 सर्वप्रमुख आहेत.
देवी-देवता आणि आई-वडिलांचा अपमान करणाऱ्यांना नरकात जागा मिळते असे म्हणतात.
दारु, तामसिक भोजन, मांसाहार करणारे, क्रोधी, अहंकारी, असहाय्याला त्रास देणाऱ्यांना नरकात शिक्षा मिळते.
या सर्वांना नरकात आपल्या पापाची शिक्षा मिळते, असे गरुड पुराणात म्हटले आहे.
पापाचे भागीदार असलेल्यांनाही नरकात शिक्षा भोगावी लागते.
नरकात जाण्यापासून वाचायचे असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
एकादशीचे व्रत ठेवल्यास मेल्यानंतर स्वर्ग मिळतो, असे गरुड पुराणात म्हटले आहे.
वाईट कर्म न केल्यास,पुण्याची कामे केल्यास,पित्रांनुसार श्राद्ध केल्यास स्वर्गात जागा मिळते. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)