'या' नद्यांच्या पाण्याला स्पर्श करायला घाबरतात भारतीय, कारण की...


हिंदू धर्मात पवित्र नदीत स्नान केल्यास पापापासून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे. माघ पौर्णिमेला पवित्र नदीत स्नान करुन दान केल्यास पुण्य प्राप्त होते.


गंगा, सरस्वती, कावेरी, ब्रह्मपुत्रा आणि सतलज या भारतातील पवित्र नद्या आहेत.


तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, भारतात पवित्र नदीशिवाय काही अपवित्र नद्याही आहेत.


बिहार आणि उत्तर प्रदेशातील कर्मनाशा नदी ही अशुभ मानली जाते. या नदीतील पाण्याला हात लावल्यास होणारं कामंही होतं नाही.


मध्य प्रदेशातील चंबळ नदी ही सर्वात मोठी नद्यांपैकी एक आहे. ही नदी अपवित्र मानली जाते कारण की, हजारो प्राण्यांच्या रक्तातून या नदीचा जन्म झाला. ही नदी शापित आहे असं म्हणतात.


फल्गु नदी बिहार राज्यातील गया जिल्ह्यातील प्रमुख नदी असून इथे लोक पिंड दान किंवा श्राद्ध करण्यासाठी येतात. पौराणिक कथेनुसार माता सीतेने या नदीला शाप दिला होता.


कोसी नदी बिहारमधील प्रमुख नदी असून तिला शोक नदी म्हणून ओळखलं जातं. अशी मान्यता आहे या नदीला पूर आल्यानंतर ती हजारो लोकांना गळती. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story