इंदिरा एकादशीला धन योगासोबत लक्ष्मी नारायण योग! 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Published by: Zee Team | Oct 09, 2023

इंदिरा एकादशीला अतिशय दुर्मिळ आणि शुभ संयोग जुळून आले आहेत. यादिवशी धन योग, शुभ योग आणि साध्य योग आहे.

Published by: Zee Team | Oct 09, 2023

तसंच इंदिरा एकादशीच्या दिवशी मघा नक्षत्र आणि लक्ष्मी नारायण योग तयार झाला आहे. त्यामुळे काही राशींसाठी हा योग आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे.

Published by: Zee Team | Oct 09, 2023

मिथुन (Gemini Zodiac)

या राशीच्या लोकांवर भगवान विष्णूची कृपा बरसणार आहे. या लोकांच्या आयुष्यातील संकट दूर होईल. सर्व कामात यश प्राप्त होईल. कर्जातून मुक्ती मिळणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे.

Published by: Zee Team | Oct 09, 2023

सिंह (Leo Zodiac)

या राशीच्या लोकांच्या सर्व समस्याचं निराकरण होणार आहे. या लोकांना मोठ्या आर्थिक लाभ होणार आहे. भविष्यातील योजनांना यश प्राप्त होणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती आणि प्रतिष्ठा मिळणार आहे.

Published by: Zee Team | Oct 09, 2023

तूळ (Libra Zodiac)

या राशीसाठी इंदिरा एकादशी अतिशय लाभदायक असणार आहे. लवकरच मालमत्ता, वाहन खरेदीची योग आहेत. लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या करिअरमध्ये प्रगती होणार आहे. गुंतवणुकीसाठी हा सर्वात चांगला काळ असणार आहे.

Published by: Zee Team | Oct 09, 2023

कुंभ (Aquarius Zodiac)

इंदिरा एकादशी कुंभ राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या शुभ सिद्ध होणार आहे. कुटुंबात सुख शांती नांदणार आहे. नोकरीत बढतीची शक्यता आहे. व्यवसायात प्रगतीच्या दिशेने तुमची वाटचाल सुरु होणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Oct 09, 2023

VIEW ALL

Read Next Story