इस्त्रायलच्या या सौंदर्यवतीचं नाव आहे ओरिन ज्यूली. ओरिन ही इस्त्रालय लष्कारातील माजी सैनिक आहे.

ओरिन ज्यूलीला बंदूकांची रानी म्हणून ओळखलं जातं. ओरिनचं इन्स्टा अकाऊंट इतर मुलींपेक्षा वेगळं आहे. तिचं अकाऊंट खतरनाक शस्त्रांनी भरलंय.

ओरिन ज्युलीला शस्त्रांची प्रचंड आवड आहे. आपल्या लग्नाच्या फोटोशूटमध्येही तिच्या हातात बंदूक आहे.

ओरिन ज्युलीने जवळपास प्रत्येक प्रकारची शस्त्र हाताळली आहेत. पण बंदूकीपासून रॉकेट लाँचरपर्यंत सर्व प्रकारची शस्त्र तिला चालवता येतात.

ओरिन 2012 मध्ये इस्त्रायली लष्कारात दाखल झाली. हातात शस्त्र घेऊन तिला मैदानात उतरायचं होतं. पण तिला डेस्क जॉब देण्यात आला.

सैन्यात असताना तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि जगभरात तिच्या सौंदर्याच्या चर्चा रंगल्या. रातोरात ती इंटरनेट सेन्सेशन बनली.

तिचे हे फोटो पाहून शस्त्र निर्मिती करणाऱ्या कंपनीने तिला मॉडलिंगची ऑफर दिली. त्यानंतर ओरिनने लष्करातून निवृत्ती घेतली. इन्स्टावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

VIEW ALL

Read Next Story