कधी आहे कर्क संक्रांती? यंदा सूर्यदेवाची मिळेल विशेष कृपा
ज्यावेळी सूर्य आपली रास बदलतो त्याला संक्रांती असं म्हणतात. वर्षभरात 12 संक्रांती येतं असतात.
श्रावण महिन्यातील संक्रांतीला कर्क संक्रांती असं म्हणतात. कारण यादिवशी सूर्य मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करत असतो.
यंदाची कर्क संक्रांती अतिशय खास आहे कारण यादिवशी सूर्यदेव दक्षिणेकडे सरकणार आहे.
16 जुलै 2023 ला कर्क संक्रांती म्हणजे सूर्य गोचर आहे. यादिवशी सूर्य उत्तरायणातून दक्षिणायनाकडे 6 महिन्यांसाठी राहणार आहे.
कर्क संक्रांती पुण्यकाळ हा दुपारी 12:27 ते रात्री 07.21 असणार आहे. तर महा पुण्य काळ संध्याकाळी 05.03 ते रात्री 07.21 पर्यंत असणार आहे.
कर्क संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने सर्व रोगांचा नाश होतो आणि दोष दूर होतात अशी मान्यता आहे. सूर्यदेवाची आराधना, मंत्रजप इत्यादी केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर करता येते.
16 तारखेपासून सूर्य पुढील सहा महिने कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक आणि धनु राशीत गोचर करतो.
या सहा महिन्यामध्ये विवाह, मुंडन, उपनयन संस्कार, गृहपाठ इत्यादी शुभ कार्यांवर बंदी असते.
सूर्य गोचरमुळे मेष, कर्क आणि कन्या राशीसाठी भाग्यशाली ठरणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)