पावसाळ्यात डेंग्यूचा धोका

पावसात पाणी साचल्याने डेंग्यूची प्रकरणं वाढतात. साचलेलं पाणी हे मच्छरांसाठी प्रजननाचं ठिकाण असतं. डेंग्यू संक्रमित मच्छरांच्या माध्यमातून तो माणसांपर्यंत येतो.

लक्षणं काय

डेंग्यू झाल्यानंतर डोकेदुखी, फणफणारा ताप तसंच स्नायू आणि सांधेदुखी होते. तसंच शरिरातील रक्तपेशी वेगाने कमी होऊ लागतात.

जीव जाऊ शकतो

या रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागतं. अन्यथा वेळेत उपचार न मिळाल्याने ते जीवही गमावू शकतात.

लक्षणं ओळखून उपचार करा

त्यामुळे डेंग्यूची लक्षणं ओळखून त्यावर उपचार केले जाऊ शकतात. तसंच योग्य काळजी घेणंही गरजेचं आहे.

घरात पाणी साचू देऊ नका

साचलेल्या पाण्यात मच्छरांचं प्रजनन होत असल्याने, घरात कुठेही पाणी साचू देऊ नका. याशिवाय घऱातील नळ आणि पाइप स्वच्छ ठेवा.

किटकनाशकांचा वापर करा

जर तुमच्या घरात किंवा आजुबाजूला मोठ्या प्रमाणात मच्छर असतील तर त्यांना पळवण्यासाठी शरिरावर क्रीम लावा.

पूर्ण शरिर झाकणारे कपडे घाला

तुमच्यासह घरातील लहान मुलांनाही संपूर्ण शरीर झाकलं जाईल असं कपडे घाला. तसंच हलक्या रंगाचे कपडेही मच्छरांना रोखण्यात मदत करतात.

खिडक्या, दरवाजे बंद ठेवा

मच्छरांना घरात येण्यापासून रोखण्यासाठी खिडक्या, दरवाजा बंद ठेवा. तसंच मच्छरदानीचा वापर करणंही चांगला पर्याय आहे. याशिवाय घरात थंड वातावरण ठेवण्यासाटी पंखे, एसीचा वापर करा. थंड वातावरणात मच्छर जास्त येत नाहीत.

संध्याकाळी बाहेर पडू नका

संध्याकाळी मच्छर जास्त प्रमाणात सक्रीय असतात. त्यामुळे असावेळी साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी जाणं टाळाला. गरज असल्यास पूर्ण कपडे आणि क्रीम लावून बाहेर पडा.

वैद्यकीय मदत घ्या

जर तुमच्या घरात कोणाला खूप ताप आला असेल, डोकं दुखत असेल, उलट्या होत असतील तर डेंग्यूची लक्षणं असू शकतात. अशावेळी तात्काळ डॉक्टरांची मदत घ्या.

VIEW ALL

Read Next Story