भारतामध्ये नद्यांना धार्मिक महत्त्व असून त्यांना फार पवित्र मानलं जातं.
भारतात सर्वाधिक पवित्र आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाची मानली जाणारी नदी म्हणजे गंगा!
गंगेला गंगा माता असंही संबोधलं जातं. गंगा नदीला भारतात अनन्यसाधारण महत्त्व असून तिला पवित्र मानलं जातं.
मात्र पाकिस्तानमध्ये कोणत्या नदीला सर्वात पवित्र मानतात? याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का?
म्हणजेच भारतात ज्याप्रमाणे गंगा नदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे तसं महत्त्व असलेली पाकिस्तानमध्ये एखादी नदी आहे का?
तर पाकिस्तानमध्ये पवित्र नदी आहे का या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे.
पाकिस्तानमध्ये लोक सिंधू नदीला सर्वात पवित्र नदी मानतात.
सिंधू नदीचं भारताशीही फार कनेक्शन असून शेकडो किलोमीटर भारतातून वाहत ही नदी पाकिस्तानमध्ये प्रवेश करते.