प्रभू श्रीरामांची कुलदेवी कोण माहितीये का? पहा मंदिराचे फोटो

नुकताच अयोध्येत श्रीरामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला.

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी गेली अनेक वर्ष संपुर्ण देश प्रतिक्षेत होता.

प्रभू श्रीरामांच्या 5 वर्षाच्या मूर्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

आज आपण श्रीरामांच्या कुलदेवीबद्दल जाणून घेऊया.

श्रीरामांच्या जन्मानंतर कौशल्या देवी अयोध्येतील या देवीच्या दर्शनासाठी घेऊन आल्या होत्या.

अयोध्येत घरी लहान बाळ जन्माला आल्यावर त्याला या देवीच्या दर्शनासाठी घेऊन येतात.

तसंच कोणत्याही नवीन कामाला सुरुवात करायची असेल, किंवा शुभ प्रसंगी या देवीचा आशीर्वाद घेतात..

महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या त्रयींचा संगम असलेल्या 'देवी देवकाली' या श्रीरामांच्या कुलदेवी आहेत.

श्रीरामांच्या कुलदेवीचं मंदिर हे अयोध्येत आहे.

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story