मार्गशीर्ष महिन्यात या 7 गोष्टी नियमित केल्यानं राहील लक्ष्मीची कृपा-दृष्टी

मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीची पुजा मनोभावे केली जाते. यामुळे लक्ष्मीची कृपा राहते आणि घरात लक्ष्मी नांदते.

या गोष्टी तुम्ही दररोज न चुकता कराल तर लक्ष्मीदेवी प्रसन्न होईल.

तुळस पुजणे

घराच्या अंगणात आणि बाल्कनीत लावली जाणारी तुळस हिंदू धर्मात पुजनीय आणि पवित्र मानली जाते. दररोज सकाळी तुळशीला पाणी घातल्यानं घरात सकारात्मक उर्जा येते.

दिवा लावणे

संध्याकाळच्या वेळेस घराची झाडलोट करुन दिवे लावावे, यामुळे अशुभ लक्ष्मी बाहेर जाते. आणि शुभ लक्ष्मी घरात येते.

वडिलधाऱ्यांचा मान राखणे

घरातील वडिलधाऱ्यांचा सन्मान करावा, यामुळे घरातील आर्थिक, मानसिक आणि शारिरीक दूर होऊन लक्ष्मी प्रसन्न राहते.

श्रीसूक्त पठण

दर शुक्रवारी घरात श्रीसूक्त पठण केल्यानं लक्ष्मीदेवीची कृपा राहते. तसचं आपल्यावर शुक्राची सुद्धा कृपा राहते.

गाईची पूजा

गाईमध्ये ३३ कोटी देवदेवता वास करतात. गाईला रोज ताजी भाकर आणि चारा खाऊ घातल्यानं माता लक्ष्मी आकर्षित होते. यामुळे मुलांना करिअरमध्ये लाभ मिळू शकतो.

शुक्रवारी काय दान करु नये

शुक्रवारी अनेक वस्तूंच दान करणं शुभ मानलं जातं परंतु साखर दान करणे वर्ज्य आहे. साखर शुक्र ग्रहाशी संबंधित असल्यामुळे दान करु नये.

VIEW ALL

Read Next Story