नवरात्र १५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. घराची साफसफाई करून मातेचे भक्त नवरात्रीची आतुरतेने वाट पाहतात.

नवरात्रीचा उत्सव सुरू होण्यापूर्वी, आपले घर पूर्णपणे स्वच्छ करा आणि पूजा खोलीपासून प्रत्येक कोपरा स्वच्छ करून घ्या.

घराची साफसफाई पूर्ण झाल्यावर घरभर गंगाजल शिंपडावे.

नवरात्रीच्या काळात तामसिक पदार्थ घरात अशुभ ऊर्जा निर्माण करते त्यामुळे साफ ​​करण्यापूर्वी हे पदार्थ काढून टाका.

केस कापणे :

नवरात्रीच्या काळात केस, नखे कापणे आणि दाढी-मिशा कापणे निषिद्ध मानले जाते.

हे काम नवरात्री सुरू होण्यापूर्वी केले तर बरे होईल.

दारावर स्वस्तिक चिन्ह :

नवरात्री सुरू होण्यापूर्वी माता दुर्गाच्या स्वागतासाठी घराच्या दारावर स्वस्तिक चिन्ह बनवा.

जर तुम्ही पूर्ण नऊ दिवस नवरात्रीचे व्रत करत असाल तर त्यासंबंधीची खरेदी अगोदर करून ठेवा जसे कि तुम्ही गव्हाचे पीठ, वरई तांदूळ, खडे मीठ, साबुदाणा, बटाटे, शेंगदाणे इत्यादी आगाऊ खरेदी करा.

VIEW ALL

Read Next Story