आयुष्यात कधीही 'या' 5 लोकांच्या पाया पडू नका, आशिर्वादाऐवजी पदरी पडेल नुकसान

हिंदू धर्मात मोठ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेण्याची संस्कृती आहे. मोठ्यांना आदर राखण्याची ही एक पद्धत आहे.

पण पाया पडताना काही लोक किंवा क्षण टाळायला हवेत. ते कोणते याबद्दल जाणून घ्या.

मंदिरात पाया पडणं चुकीचं

जर तुम्ही मंदिरात असाल तर कोणाच्या पाया पडू नका आणि कोणाला तुमच्याही पाया पडू देऊ नका. देवाच्या गाभाऱ्यात कोणाच्याही पायाला स्पर्श करु नये.

पूजा करणारी व्यक्ती

पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडणंही योग्य नाही. असं केल्याने त्याला पूजेचं फळ मिळत नाही.

स्मशानातून परतलेली व्यक्ती

स्मशानातून परतलेल्या व्यक्तीच्या पाया पडणं अशुभ मानलं जातं. असं केल्याने तुमचं नुकसान होऊ शकतं.

झोपलेली व्यक्ती

झोपलेल्या व्यक्तीच्या पाया पडणं चुकीचं मानलं जातं. कारण झोपलेल्या व्यक्तीच्या पायांना फक्त मृतावस्थेत असताना स्पर्श केला जातो.

मुलींना पाया पडायला लावू नका

कधीही मुलींना पाया पडायला सांगू नका. असं करणं पाप ठरू शकतं.

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story