23 नोव्हेंबरला देवउठनी एकादशी आणि 24 नोव्हेंबरला तुळशी विवाह आहे. त्यामुळे या शुभ मुहूर्तावर तुळशीला चार गोष्टी अर्पण केल्यावर तुम्हाला कधीच पैशांची चणचण जाणवणार नाही.
देवउठनी एकादशीला व्रत केल्यास देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा विशेष आशिर्वाद प्राप्त होतो, अशी मान्यता आहे.
भगवान विष्णुंना प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या धाग्यात 108 गाठी बांधून त्या तुळशीच्या रोपाला बांधा.
देवउठनी एकादशीला तुळशीला लाल ओढणी अर्पण करा. त्यामुळे घरात धन समृद्धीचा वास राहतो.
देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देवउठनी एकादशीला तुळशीला कलावा अर्पण करा.
देवउठनी एकादशीला तुळशीला कच्च दूध अर्पण करणं शुभ मानलं जातं. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)