4 राशींचा सुवर्ण काळ

चंद्रग्रहणानंतर शनिदेव होणार मार्गी

दसरा आणि चंद्रग्रहणानंतर शनिदेव मार्गी होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाचा मार्ग बदलामुळे 4 राशींचा सुवर्ण काळ सुरु होणार आहे. त्यामुळे त्यांची दिवाळी धनवान होणार आहे.

शरद पौर्णिमा 28 - 29 ऑक्टोबरला मध्यरात्री चंद्रग्रहण असणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. त्यानंतर 4 नोव्हेंबरला न्यायदेवा शनी थेट कुंभ राशीत मार्गी होणार आहे.

वृषभ (Taurus)

करिअर आणि व्यवसायात प्रगती होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होणार आहे. तुमच्या योजना या काळात यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत.

मिथुन (Gemini)

शनिदेव या राशींचं संकट दूर करणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. तुम्ही दिवाळीत मालमत्ता किंवा वाहन खरेदी करु शकता. अडकलेले पैसे परत मिळणार आहे.

सिंह (Leo)

या राशींसाठी शनिदेव सुवर्ण काळ घेऊन आला आहे. नोकरी आणि व्यवसायात आर्थिक लाभ होणार आहे. आरोग्य उत्तम साथ देणार आहे.

कुंभ (Aquarius)

शनी स्वत:च्या राशीतच थेट प्रवेश करणार आङे. त्यामुळे या लोकांसाठी तो वरदान ठरणार आहे. घरात आनंदाचं वातावरण असणार आहे. तंत्रज्ञान, कला आणि वित्त क्षेत्रातील लोकांना अधिक लाभ होणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story