Shani Mangal Yuti 2023

शनि - मंगळाचा अशुभ संयोग! 30 जूनपर्यंत 'या' लोकांचं आयुष्य अमंगळ

मंगळ आणि शनि शत्रू

ज्योतिषशास्त्रात मंगळ आणि शनि हे एकमेकांचे शत्रू ग्रह मानले जातात. वास्तविक यावेळी मंगळ शनीच्या सहाव्या भावात असून शनि आणि मंगळाच्या संयोगामुळे षडाष्टक योग होत आहे.

षडाष्टक योग

षडाष्टक योग ज्योतिषशास्त्रात अशुभ मानला जातो. ३० जूनपर्यंत मंगळ कर्क राशीत राहणार आहे. या संयोगाचा चार राशीच्या लोकांच्या जीवनावर सर्वात जास्त प्रभाव पडेल.

कर्क (Cancer)

जीवनात अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. या काळात तुम्हाला आर्थिक बाबींवर खूप सावध राहावे लागेल. तुमचे बजेट लक्षात घेऊन काम करा.

सिंह (Leo)

तुम्हाला कामाच्या ठिकाणीही अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यावेळी तुम्ही काही वादातही अडकू शकता. या काळात तुम्ही वाद टाळण्याचा प्रयत्न कराल परंतु, तुम्ही अयशस्वी ठराल. या काळात तुमचा खर्चही खूप वाढू शकतो.

धनु (Sagittarius)

आर्थिक स्थितीत बरेच चढ-उतार होणार आहेत. या दरम्यान, तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीशी सावध राहण्याची गरज आहे. खरं तर, तुमची त्यांच्याकडून फसवणूक होऊ शकते. तुमच्या स्वतःच्या काही गोष्टी तुमचे आर्थिक नुकसान करू शकतात.

कुंभ (Aquarius)

तुम्हाला इजा होऊ शकते. या दरम्यान तुमचे काम पूर्ण लक्ष देऊन करा. कामाच्या बाबतीत तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो. फक्त ताणतणाव तुमच्यावर येऊ देऊ नका नाहीतर तुम्हाला समस्या येऊ शकते. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story