हिंदू धर्मात गायीला अतिशय पवित्र मानलं जातं. गायीच्या पोटात 33 कोटी देवतांचा वास असल्याची मान्यता आहे.
अनेक लोक घरातील शिळं अन्न हे दुसऱ्या दिवशी गायीला खायला देतात. ज्योतिषशास्त्रानुसार गायीला शिळी चपाती खायला द्यावी की नाही जाणून घ्या.
हिंदू धर्मात गायीला मातेचा दर्जा देण्यात आलाय. त्यात शास्त्रानुसार पहिली चपाती ही गायीसाठी बनवावी, असं सांगण्यात आलंय.
शिळं अन्न किंवा चपाती गायीला खाऊ घालणे अशुभ मानलं जातं. त्यामुळे देवीदेवता नाराज होतात, अशी मान्यता आहे.
पहिली चपाती ही गायीची असते तिला खाऊ घ्यातल्यास आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात असं म्हटलं जातं.
गाईला शिळ्या चपात्या खायला देऊ नये. पण अन्न वाया जाऊ नये अशावेळी तुम्ही गूळ आणि शिळी चपाती गाईला देऊ शकता. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)