Shukrawar Upay

अपार धनसंपदा देणारा वार आहे शुक्र, आजचं करा 'ही' कामं

शुक्र हा सुख, समृद्धी आणि संपत्तीचा कारक आहे. शुक्र हा वार माता लक्ष्मीला समर्पित केलेला आहे. या दिवशी केलेल्या 5 कामांचा तुम्हाला भरपूर लाभ होतो

शुक्रवारी माता लक्ष्मीचे उपवास केल्यास फायदा होतो. असं म्हणतात हे उपवास केल्यामुळे शुक्रवारी शारीरिक कष्टांपासून मुक्तता मिळते. वैवाहिक जीवन सुखी येतं. लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त होऊन आर्थिक स्थिती मजबूत होतं. शिवाय कुंडलीतील शुक्र ग्रहाचं शुभ फल मिळतं.

शुक्रवार माता लक्ष्मीचा दिवस असल्याने आजच्या दिवशी घर आणि शरीराची स्वच्छतेची काळजी घ्या. अंघोळीच्या पाण्यात तुरटी मिसळून आंघोळ करा.

शुक्रवारी आंबट पदार्थांचं सेवन करू नये. शुक्रवारी उपवास करताना आंबट पदार्थांचं सेवन केल्यास अपघाताचा धोका वाढतो असं म्हणतात. यासोबत या दिवशी पिशाच किंवा निशाचर यांच्या कर्मापासून अंतर ठेवणं गरजेचं आहे.

शुक्रवारी गोड पदार्थांचं सेवन करणं शुभ मानलं जातं. या दिवशी दूध, तांदूळ आणि केशर यांची खीर बनवून ती देवी लक्ष्मीला अर्पण करा. किमान 5 मुलींमध्ये ही खीर वाटप करा, हा उपाय केल्यामुळे दारिद्र्य नाहीसे होते.

जर कुंडलीत शुक्राची स्थिती चांगली नसेल तर रोज रात्री झोपताना तुरटीने दात घासावेत आणि शुक्रवारी पाण्यात तुरटी टाकून स्नान करावे. यामुळे शुक्राचा दोष दूर होतो.(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story