स्वप्नशास्त्रानुसार (Dream Interpretation) प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो.
स्वप्नशास्त्रात प्रत्येक स्वप्नाचं योग्य पद्धतीने वर्णन केलंय.
अनेकदा लोक कुतूहलाने स्वप्ने इतरांना सांगतात, परंतु स्वप्न शास्त्रात तसं करणं योग्य नाही.
जाणून घेऊया अशी कोणती स्वप्न कोणती स्वप्नं आहेत? जी इतरांना सांगू नयेत
स्वतःचा किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे स्वप्न पाहत असाल तर याचा अर्थ आहे की, तुमचे सर्व त्रास संपणार आहेत.
स्वप्नात चांदीने भरलेला कलश दिसला तर ते खूप शुभ मानलं जातं, हे स्वप्न इतर कोणाला सांगू नये, यामुळे तुमचं भविष्यात नुकसान होऊ शकतं.
निसर्गाशी संबंधित कोणतेही स्वप्न पाहणं चांगलं मानलं जातं. हे स्वप्न इतरांना सांगितल्यास तुमचं नुकसान होऊ शकतं.
स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात सिंह दिसणं शुभ लक्षण मानलं जातं. याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनात कोणतीही समस्या येईल, तुम्ही त्याचा सहज सामना करू शकाल. मात्र हे स्वप्न इतरांना सांगितल्यास तुमच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)