भावासाठी शोधताय युनिक राखी? हे पर्याय कसे वाटतायत?

रक्षाबंधनाचा सण

रक्षाबंधनाचा सण भाऊ-बहिणीसाठी खूप खास असतो. आपल्या भावाच्या मनगटावर सर्वात सुंदर राखी असावी अशी प्रत्येक बहिणीची इच्छा असते.

नवीन डिझाइन

जर तुम्ही राखीच्या नवीन आणि लेटेस्ट डिझाइन्स शोधत असाल तर बाजारात आलेल्या काही नवीन राख्या पाहून घ्या.

ब्रो किंग डिझाइन

तुम्ही ही राखी निवडू शकता ज्यावर ब्रो आणि किंग क्राउन लिहिलेले आहे.

स्टोन राखी

गुलाब आणि चांदीच्या स्टोननी भरलेली ही राखी मनगटावर सुंदर दिसेल.

कार्टून किंवा प्रिंटेड राखी

तुमचा भाऊ खूप लहान असेल तर डोरेमॉन किंवा इतर कार्टूनची राखी घेऊ शकता. याशिवाय बेस्ट ब्रदर प्रिंटेडह राखी ट्राय करू शकता.

मोत्याच्या फुलांची राखी

फ्लॉवर स्टाईलमध्ये मोत्याने भरलेली राखी भावाच्या हातावरही सुंदर दिसेल.

फोटोवाली राखी

भावासोबत सुंदर फोटो लावून राखी बनवू शकता.

मोराची राखी

स्टोनने बनवलेल्या मोराच्या डिझाईनची राखीही मनगटावर सुंदर दिसेल.

रुद्राक्ष राखी

रुद्राक्ष, डमरू आणि त्रिशूल डिझाइन असलेली ही राखी लेटेस्ट ट्रेंडमध्ये आहे.

कस्टमाइज राखी

जर भावासाठी स्पेशल राखी हवी असेल तर तुम्ही राखीवर वीरा किंवा भावाचे नाव लिहू शकता.

VIEW ALL

Read Next Story