Ashoka Tree and Vastu Benefits : अशोक हा अत्यंत पवित्र वृक्ष मानला जातो. त्याची पाने पूजेत वापरली जातात. शोक वृक्षाचे अनेक फायदे आहेत. आपले दु:ख दूर होण्यास मदत होते. तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते.
Ashoka Tree and Vastu Benefits : घराच्या अंगणात, बागेत, व्हरांड्यावर किंवा उंबरठ्यावर अशोकाचे रोप लावल्यास ते शुभ असते, हे झाड आपल्या घराच्या आजूबाजूला लावले तरी दुःख आणि दारिद्र्य येत नाही. अशोकामुळे मानसिक तणावही दूर होतो पण लक्षात ठेवा अशोकाची रोपे घरामध्ये लावू नयेत.
वास्तूनुसार अशोक वृक्ष मानसिक आणि शारीरिक चैतन्य वाढवतो. अशोकाचे झाड घरातील वास्तुदोष दूर करण्यास सक्षम आहे. घराच्या मुख्य दरवाजाजवळ कोपऱ्यात अशोकाचे झाड लावल्याने धनाची प्राप्ती होते. सर्व कामे कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होतात.
7 अशोकाची पाने आणून घरातील देवाऱ्यात ठेवल्याने वैवाहिक जीवनात आनंद येतो. पती-पत्नीचे नाते गोड होऊ लागते.
अशोकाच्या पानांचा उपयोग शुभ कार्य, पूजा-विधी, विवाह, यज्ञोपवीत, ग्रह प्रवेश इत्यादींमध्ये केला जातो. देवी-देवतांच्या समोर अशोकाच्या पानावर इच्छा लिहिल्यास ती लवकर पूर्ण होते.
लग्नाला उशीर झाल्यास अशोकाची पाने पाण्यात मिसळून स्नान करण्याचा सल्ला जाणकार लोक देतात. असे सतत 42 दिवस केल्याने फायदा होतो.
अशोकाच्या झाडाची साल किंवा पानांचे सेवन केल्याने पोटातील कृमी निघण्यास मदत होते. अशोकाच्या झाडाच्या सालामध्ये बुरशीविरोधी, बॅक्टेरियाविरोधी आणि वेदना कमी करणारे गुणधर्म देखील असतात.
अशोकामुळे मानसिक तणावही दूर होतो पण लक्षात ठेवा अशोकाची रोपे घरामध्ये लावू नयेत.
अशोकाला बंगालीमध्ये अस्पाल, मराठीत अशोक, गुजरातीमध्ये असोपालव आणि देशी पिवळी फुले, सिंहलीमध्ये होगाश आणि लॅटिनमध्ये जोनासिया अशोक किंवा सरका-इंडिका म्हणतात.