वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी एक नियम सांगितला आहे. तसेच वास्तुशास्त्रामध्ये झाडू संबंधितदेखील काही नियम आहेत.
तुम्हाला माहित आहे का झाडूचा अनादर केल्याने देखील तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
वास्तुशास्त्रानुसार झाडूला लक्ष्मीचं रूप मानलं जातं.त्यामुळे झाडूला कधीहा पाय लावू नये.असे केल्यास लगेचच झाडूला स्पर्श करून माफी मागावी.
असं सांगितले जाते की झाडू कधीही उभा ठेवू नये. असे केल्याने लक्ष्मीचा वास जास्त काळ राहत नाही.
झाडू कधीही समोर ठेवू नये. खरतर झाडू समोक असेल तर लक्ष्मी वास करत नाही असे म्हटले जाते. त्यामुळे झाडू नेहमी अशा ठिकाणी ठेवावा जो कोणालाही दिसणार नाही.
वास्तुशास्त्रानुसार झाडू नैऋत्य दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी घरावर राहतो आणि आर्थिक समस्या देखील दूर होतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)