जगभरात मांसाहाराच्या बाबतीत अनेक देश आघाडीवर आहेत. त्याचसंदर्भात संयुक्त राष्ट्र फूड अँड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशननं याबाबतची आकडेवारी समोर आणली.
UN च्या माहितीनुसार जगभरात अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया मांसाहार करणाऱ्या राष्ट्रांमध्ये आघाडीवर आहे.
जगात सर्वाधिक म्हणजेच 36 टक्के पसंती पोर्क अर्थात डुकराच्या मांसाला आहे. त्यामागोमाग चिकनला पसंती मिळताना दिसते.
जगभरात 33 टक्के मांसाहारप्रेमी चिकन आणि अंड्यांना पसंती देतात. तर, 24 टक्के मंडळी बीफ आवडीनं खातात.
अवघी 5 टक्के मंडळी बकरा किंवा मेंढ्याचं मटण खातात.
जगात सर्वात कमी मांसाहार करणाऱ्या देशांमध्ये भारत आणि बांगलादेशचा समावेश आहे.