स्वयंपाकघरातील भांडी कशी असावीत

स्वयंपाकघरातील भांडी स्टीलच्या भांड्यांऐवजी पितळ, तांबे, चांदी, पितळेची भांडी वापरली जातात. पितळेतील अन्न खाणे आणि तांब्यातील पाणी पिणे हे धार्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातून खूप फायदेशीर आहे.

या मंत्राचा जप करा

घरातील स्त्रिया स्वयंपाक करताना नवर्णव मंत्र, गायत्री मंत्र, समर्थ मंत्र जपतात तेव्हा स्वयंपाक अधिक चविष्ट आणि रुचकर होतो. मंत्राची शक्ती आणि गुणधर्म अन्नात उतरतात. कुटुंबात काही दोष असतील, चिडचिड असेल, कुटूंबात काही विकृती असेल तर ती कमी होण्यास मदत होते आणि काही लोक व्यसनातून मुक्त होतात असे सांगितले जाते.

धान्यांची योग्य जागा कोणती?

धान्य आणि दैनंदिन वस्तूंचा साठा करण्यासाठी स्वयंपाकघरातील दक्षिण-पश्चिम, नैऋत्य दिशेला प्राधान्य द्या, यामुळे सौभाग्य आणि समृद्धीचे आमंत्रण मिळते. रिकामे डबे फेकून द्या किंवा त्यात काही धान्य भरा.

अन्नधान्य,मसाले या दिशेला ठेवा

स्वयंपाकघरात मीठ, हळद, तांदूळ आणि पीठ असावे. हे संपण्यापूर्वी भरुन ठेवा असा वास्तुचा सल्ला आहे. वास्तूनुसार स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यात मीठ ठेवू नका. काचेच्या भांड्यात किंवा बरणीत ठेवा. यामुळे घरात शांतता राहते आणि आर्थिक समस्या दूर राहतात.

फ्रिज, मिक्सर, ओव्हन ठेवण्याची योग्य जागा

फ्रिज, मिक्सर, ओव्हन स्वयंपाकघराच्या आग्नेय भागात ठेवता येते. फ्रिजवर कोणत्या ही वस्तू ठेवू नयेत. जर तुम्हाला स्वयंपाकघरात रेफ्रिजरेटर ठेवायचे असेल तर ते दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवा कारण ते तुम्हाला जीवनातील अडथळे दूर करण्यास मदत करेल.

भांडी, चाकू कुठे ठेवाल

स्वयंपाकघराच्या पूर्व उत्तर भागात भांडी ठेवावी. वास्तूनुसार चाकू आणि कात्री आवरणाखाली किंवा कपाटाच्या आत ठेवावेत. त्यांना उघड्यावर ठेवल्याने कुटुंब आणि मित्रांसोबत कटु संबंध निर्माण होऊ शकतात.

स्वयंपाकघरातील ही दिशा मोकळी असावी

स्वयंपाकघरच्या दक्षिणेकडील भागात जास्तीत जास्त वजन ठेवणे आवश्यक आहे. पश्चिमेला वजन ठेवण्यासाठी दुसरे प्राधान्य दिले पाहिजे. स्वयंपाकघरातील पूर्वेकडील भिंत शक्य तितकी मोकळी ठेवता येईल तेवढीच उत्तरेकडील भिंत किंवा जागाही मोकळी ठेवणे आवश्यक आहे.

स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावे

स्वयंपाकघर दक्षिण-पूर्व भागात असावे आणि स्वयंपाक करताना पूर्वेकडे तोंड करावे. वास्तूनुसार अग्निस्रोतांची नियुक्ती दक्षिण-पूर्व असावी. स्वयंपाक करताना तुमचे तोंड असण्याची पर्यायी दिशा पश्चिम ही आहे. जर पूर्वेकडे तोंड करता येत नसेल तर उत्तरेलाही तोंड केलं तरी चालेल.

VIEW ALL

Read Next Story