उजवा की डावा,

कोणता डोळा फडफडणे असते शुभ?

समुद्रशास्त्रानुसार डोळा फडफडणे हे तुम्हाला भविष्यातील शुभ आणि अशुभ घटनेचे संकेत देत असतात. पण कुठला डोळा फडफडणे स्त्री आणि पुरुषांसाठी शुभ असतो ते जाणून घेऊयात.

डोळा हा साधारण काही सेकंद किंवा 1 ते 2 मिनिटांपर्यंत फडफडतो. डोळा फडफडण्याचा संबंध हा शुभ आणि अशुभ याच्याशी जोडला जातो.

पण स्त्री आणि पुरुषांसाठी कुठला डोळा फडफडणे शुभ असतो याबद्दल सामुद्रिक शास्त्रात सांगण्यात आलं आहे.

शास्त्रानुसार पुरुषाचा उजवा डोळा फडफडणे किंवा पापणी लवणे अत्यंत शुभ मानलं जातं.

ज्या पुरुषाचा उजवा डोळा फडफडतो त्यांना मोठा धनलाभ होतो. कामातील अडचणी दूर होतात. कामाच्या ठिकाणीही तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल.

जर पुरुषाचा डावा डोळा फडफडणे हे भविष्यातील संकटांचं संकेत असतं. तुमच्या आनंदाला ग्रहण लागू शकतं. तुमचे गुप्त शत्रु अजून सक्रिय होतात.

तर स्त्रियांचा उजवा डोळा किंवा पापणी फडफडणे अतिशय अशुभ मानले जाते. त्याच्या भविष्यात अशुभ घटना घडू शकतो.

तर डावा डोळा किंवा डाव्या डोळ्याची पापणी फडफत असेल तर तुम्हाला मोठा धनलाभ होणार. कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळू शकते. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story