घरात कडूलिंबाची पानं जाळली तर काय होते ?

कडूलिंबाची पानं

आरोग्यापासून अध्यात्मापर्यंत कडूलिंबाची पानं गुणकारी समजली जातात पण तुम्हाला माहित आहे का घरात कडूलिंबाची पानं जाळल्याने काय फायदे होतात.

हवा शुद्ध राहण्यास मदत

बहुतेवेळा कडूलिंबाची पानं घरात जाळली जातात यामुळे हवा शुद्ध राहण्यास मदत होते आणि रोगसुद्घा दूर राहतात.

वाईट नजरेपासून मुक्ती

कडूलिंबाची पानं जाळून धूर केल्याने वाईट नजरेपासून मुक्ती मिळते आणि भूत-प्रेत यांसारख्या समस्या देखील दूर होतात.

नकारात्मक ऊर्जा

जर तुम्हाला घरात नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर कडूलिंबाची पानं जाळल्याने सकारात्मक ऊर्जा तयार होण्यास मदत होते.

मानसिक ताणतणाव

जर तुम्हाला मानसिक ताणतणावांचा सामना करावा लागत असेल तर कडूलिंबाची पाने जाळावीत बॅक्टेरिया नष्ट होतात आणि मानसिक ताण देखील दूर होतो.

पितृदोष

घरामध्ये कडुलिंबाचे झाड लावल्यास पितृदोष आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो, यामुळे व्यक्तीला यश मिळते.

कुंडलीतील शनि शांत होतो

कडुलिंबाच्या लाकडाने हवन केल्याने कुंडलीतील शनि शांत होतो. त्याचबरोबर आयुष्यात येणाऱ्या अडचणीही दूर होऊ लागतात.

हनुमानजी प्रसन्न

ज्योतिष शास्त्रानुसार कडुनिंबाची पूजा केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात. यासाठी दररोज कडुलिंबाच्या झाडाला पाणी अर्पण करावे.(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story