आर्थिक लाभासाठी स्वयंपाकघरात काय ठेवावं?


वास्तुशास्त्रात स्वयंपाकघर हे सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. किचनशी संबंधित चुका तुमच्या घरात नकारात्मक परिणाम घडवतं.


वास्तूशास्त्रात घरातील दिशा आणि त्यातील वस्तू अतिशय महत्त्वाच्या असतात. त्यातही स्वयंपाकघराची दिशा आणि त्यातील वस्तू हे तुमच्या जीवनावर परिणाम करतात असं वास्तूशास्त्रात सांगण्यात आलं आहे.


स्वयंपाकघरात काही शुभ गोष्टी ठेवल्याने आपल्या जीवनात सकारात्मक प्रभाव पडतो, असं वास्तूशास्त्रात सांगण्यात आलं आहे.


हळदीला धार्मिक महत्त्व असून पूजेसोबतच ते घरातील स्वयंपाकघरात ठेवल्याने शुभ परिणाम देतो.


स्वयंपाकघरात हळद ठेवल्याने आर्थिक लाभाचा मार्ग मोकळा होतो, असं वास्तूशास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे स्वयंपाक घरात हळद ठेवावा असं सांगतात.


पितळ आणि तांब्याची भांडी नेहमी किचन पश्चिम दिशेला ठेवावीत.


स्वयंपाकघरातील आग्नेय कोपऱ्यात विद्युत उपकरणे ठेवावीत.


घरात सुख समृद्धी टिकण्यासाठी स्वयंपाकघरासमोर शौचालय बांधण्यास मनाई आहे. त्याशिवाय शौचालयाच्या खाली किंवा वर स्वयंपाकघर बांधू नये.


आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी स्वयंपाकघरात तुळस आणि कोरफड ठेवावं. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story