हनुमानाच्या गदेचं नाव काय? ती त्याला कोणी आणि कशासाठी दिलेली? ही रंजक गोष्ट माहितीये का?

Swapnil Ghangale
Dec 24,2024

या व्यक्तीने दिलेली गदा

मारुतीरायाकडे असणारी गदा त्याला कुबेराने दिली होती.

एक आशीर्वादही दिलेला

कुबेराने भगवान हनुमानाला गदा देताना एक आशीर्वादही दिला होता.

...तर कोणीही पराभव करु शकणार नाही

गदा हतात घेऊन युद्ध लढत असताना हनुमानाचा कोणीही पराभव करु शकणार नाही, असं कुबेराने आशीर्वाद देताना म्हटलेलं.

गदा एवढी शक्तीशाली की...

हनुमानाची गदा सोन्यापासून बनवलेली असून एका फटक्यात डोंगर फोडण्याइतकी ही गदा शक्तीशाली असल्याचं मानलं जातं.

एक रंजक कथा

भगवान हनुमानाला गदा देण्याची एक रंजक कथाही आहे.

सूर्य गिळला होता तेव्हा...

लहानपणी जेव्हा चिमुकल्या हनुमानाने सूर्य गिळला होता तेव्हा सगळीकडे अंधकार पसरला होता.

हनुमानाला बेशुद्ध केलं

सूर्याला मुक्त करण्यासाठी इंद्राने वज्र प्रहार करुन हनुमानाला बेशुद्ध पाडलं.

पवन देव नाराज

पवनपुत्र हनुमानावर हल्ला केल्याने पवन देव नाराज झाले आणि त्यांनी वारा रोखून धरला.

तेव्हाच मिळाली गदा

पवन देवतेचा राग शांत होण्यासाठी प्रत्येक देवाने भगवान हनुमानाला एक एक शक्ती दिली. त्याचवेळी कुबेराने हनुमानाला गदा दिली.

गदेचं नाव काय?

मारुतीरायाच्या गदेचं नावही होतं. मारुतीयाच्या गदेचं नाव 'कौमोदकी' असं आहे.

धार्मिक मान्यतांवर आधारीत

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून आणि धार्मिक मान्यतांवर आधारीत असून 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) (सर्व फोटो - एआयवरुन)

VIEW ALL

Read Next Story