कोणत्या दिवशी तेल घरात आणू नये आणि का?

शनिच्या हालचालीचा मानवावर विपरित परिणाम होऊ नये म्हणून विद्वानांनी अनेक नियम बनवले आहेत, त्यापैंकी एक म्हणजे शनिवारी घरात तेल, लोखंड खरेदी करू नये असे सांगितले आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार, शनिदेवाच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी असे अनेत नियम सांगितले आहेत.

यापैंकी एक म्हणजे शनिवारी घरात तेल आणू नये कारण तेल शनीला खूप प्रिय आहे आणि शनिवारी तेलाचे दान केले जाते.

यादिवशी तेल घरी आणल्याने व्यक्तीवर शनीचा विपरीत परिणाम होतो पण हे सत्य प्रत्येकालाच लागू होत नाही.

ज्यांच्या कुंडलीमध्ये शनि शुभ स्थानी आहे किंवा ज्यांच्या कुंडलीत शनि उच्च राशीत आहे, स्वत:चे राशी, मूल त्रिकोण राशीत आहे किंवा ज्यांच्यावर शनिचे वर्चस्व आहे ते या नियमाला अपवाद आहेत.

घरातील कोणत्याही सदस्यावर शनीची अशुभ दृष्टी असेल तर त्यांनी शनी संबंधित गोष्टी घरी आणू नये यामुळे वाईट परिणाम होऊ शकतात.

मान्यतेनुसार जर लोकांनी घरात तेल आणले तर त्यांनी शनि घरी आणल्याचे मानले जाते, त्यामुळे ज्यांचा शनि अशुभ आहे त्यांनी शनीला घरी आणू नये आणि शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करावे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story