वैकुंठ चतुर्दशीला विष्णूंना बेल आणि महादेवाला तुळस का वाहतात?

भगवान महादेवाला बेल आणि भगवान विष्णूंना तुळस प्रिय आहे, हे सर्वांना माहिती आहे. मग वैकुंठ चतुर्दशीला हे उलट का केलं जातं?

पंचांगानुसार वैकुंठ चतुर्दशी तिथी 25 नोव्हेंबरला संध्याकाळी 05:22 वाजेपासून 26 नोव्हेंबरला दुपारी 03:53 वाजेपर्यंत असणार आहे.

वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर महादेवाला प्रसन्न करण्यासाठी भगवान विष्णूंनी वारासणीतील मणिकर्णिका घाटावर स्नान केलं होतं. विष्णूंच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन महादेवाने त्यांना दर्शन दिलं. त्यावेळी त्यांनी वर दिलं की, वैकुंठ चतुर्दशीला विष्णू भक्त किंवा शिव भक्त भगवंताची आळवणी करतील, त्यांना वैकुंठ मिळेल.

आषाढी एकादशीला भगवान विष्णू झोपतात आणि कार्तिकी एकादशीला ते जागे होतात. म्हणून त्याला देवउठनी एकादशी असं म्हणतात. विष्णूंचा अनुपस्थितीत सर्व जबाबदारी ही महादेवावर असते. जागे झाल्यानंतर विष्णू महादेवाला फळं, फुलं आणि बेल वाहतात. तर शंकर देवही विष्णूला तुळस वाहून जागे करतात.

वैकुंठ चतुर्दशीला हरी हर स्त्रोतचं पठण केलं जातं. तर विष्णूंची सहस्त्र नावं घेऊन विष्णूला बेल आणि महादेवाला तुळशीची पानं अर्पण केली जातात.

ही आगळे वेगळे पूजा फक्त वैकुंठ चतुर्दशीला होतं. वैकुंठ प्राप्तसाठी यादिवशी प्रत्येक जण पूजा करतो. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story