हिंदू धर्मात मंदिरात गेल्यावर आणि आरती करताना घंटी वाजवली जाते.
असं म्हटलं जातं की, मंदिरात गेल्यावर घंटी वाजवल्याने देव जागे होतात. तसेच सकारात्मक ऊर्जा शरीरात निर्माण होते.
काही लोक मंदिरात जाताना जशी घंटी वाजवतात अगदी तशीच घंटी निघताना देखील वाजवतात.
मंदिरात घंटी वाजवणे हे अतिशय शुभ मानले जाते.
पण मंदिरातून निघताना अजिबात घंटी वाजवू नये कारण हे अशुभ मानले जाते. देव नाराज होतात.
मंदिरातही गेल्यावर सतत घंटी वाजवू नये. एक ते दोन वेळाच फक्त घंटी वाजवावी.
घंटा नाद करताच मंत्र किंवा आरती बोलणे आवश्यक आहे. त्यामुळे घंटी वाजवताना ही गोष्ट लक्षात ठेवा.
ज्या मंदिरात घंटानाद होतो तेथील वातावरण हे अतिशय शुद्ध असल्याचे मानले जाते.