महिला नारळ का फोडत नाहीत?
हिंदू धर्मातील प्रत्येक कार्यात नारळाला विशेष महत्त्व आहे. कोणतीही पूजा किंवा यज्ञ असो नारळ आवश्यक असतो.
पण हे नारळ जेव्हा देवाला अर्पण केलं जातं किंवा फोडलं जातं. त्याबद्दल हिंदू धर्मात नियम आहे.
नारळ हे एक फळ असून ते हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानलं जातं. देवाला नारळ अर्पण शुभ असतं.
कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही नारळ फोडून केली जातं. यामुळे कामात यश मिळतं अशी मान्यता आहे. मग हे फळ महिला का फोडू शकतं नाहीत.
नारळात त्रिदेव वास करतात असं म्हणतात. नारळाच्या वरच्या भागात तीन डोळे असतात. हे डोळे म्हणजे भगवान शिवचं प्रतीक मानलं जातं. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असंही म्हटलं जातं.
धार्मिक मान्यतेनुसार असं म्हणतात की, भगवान विष्णुजींनी माता लक्ष्मीसोबत पहिल्यांदा फळ म्हणून नारळ पृथ्वीवर पाठवलं होतं. शिवाय वरियालवर फक्त माता लक्ष्मीचा अधिकार असल्याने महिलांना नारळ फोडण्यास मनाई आहे.
देवाला नारळ अर्पण केल्याने दुःख आणि वेदना नष्ट होतात, अशी मान्यता आहे. घरामध्ये नारळ फोडल्याने नकारात्मकता नाहीशी होते. नारळ म्हणजे बीज आणि मूल हे आईच्या गर्भात असताना बीजासारखं असतं. म्हणून हिंदू धर्मात महिलांना नारळ फोडणं वाईट मानलं जातं. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)