2024 हे वर्ष क्रिकेट खेळाडूंच्या निवृत्तीचं वर्ष ठरलं. यादरम्यान जवळपास 9 भारतीय तर 14 विदेशी खेळाडूंनी क्रिकेटच्या काही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून आपली निवृत्ती जाहीर केली.
भारताचा स्टार ओपनिंग फलंदाज शिखर धवन याने वयाच्या 38 व्या वर्षी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. 24 ऑगस्ट 2024 रोजी शिखरने हा निर्णय घेऊन सर्वांनाच धक्का दिला होता.
17 वर्ष क्रिकेटमध्ये करिअर केल्यावर भारतीय क्रिकेटर वृद्धिमान साहा याने 2024 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.
मराठमोळा क्रिकेटर केदार जाधव याने 3 जून 2024 रोजी वयाच्या 39 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली.
विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा या तिघांनी टी 20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद जिंकल्यावर टी 20 फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली.
वयाच्या 34 व्या वर्षी सौरभ तिवारी याने प्रोफशनल क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे सांगितले. फेब्रुवारी 2024 मध्ये त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला.
भारताचा स्टार विकेटकिपर आणि फलंदाज दिनेश कार्तिक याने वयाच्या 39 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली.
विदेशी खेळाडूंपैकी जेम्स अँडरसन, डेव्हिड मलान, शॅनॉन गॅब्रियल, डेव्हिड वॉर्नर, डेव्हिड व्हिजा, नील वँगनर, डिएन एल्गर, मॅथ्यू वेड, कॉलिन मुन्रो, विल पुकोवस्की, मोईन अली, बरिंदर स्रण, हेनरिक क्लासेन यांनी 2024 मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली.
तर बांगलादेशचा महमुदुल्लाह आणि शाकिब अल हसन या दोघांनी 2024 मध्ये टी 20 क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.