घरी आपण रंगबेरंगी, सुंदर पॅटर्न आणि डिझाइनच्या बेडशीट वापरतो.
पण तुम्ही हॉटेलमध्ये राहिला असाल तर तिथे तुम्हाला पांढऱ्या रंगाच्याच बेडशीट दिल्या गेल्याचे पाहिले असेल.
हॉटेल रुम्समध्ये पांढऱ्या रंगाच्या चादरीच का वापरल्या जातात? कधी विचार केलाय का?
हॉटेल आणि ट्रेनमधील चादर स्वच्छ करण्यासाठी ब्लीचचा वापर केला जातो.
ब्लिचिंग टेक्निकमुळे चादरीत कोणता दुर्गंध राहत नाही. पण चादरीचा रंग फिका पडतो. रंगबेरंगी चादरीचा रंग उडण्याची शक्यता असते.
ब्लीच क्लिनिंगमुळे पांढरी चादर सहज स्वच्छ होते.
पांढरा रंग पाहून मन शांत राहतं. स्ट्रेस दूर होतो आणि सकारात्मकता मिळते.
तुम्ही हॉटेलमध्ये असा किंवा ट्रेनमध्ये तुम्हाला रिलॅक्स वाटण्यासाठी पांढरी चादर दिली जाते.
सफेद चादरीवर डाग सहज दिसतात.
हॉटेल कर्मचाऱ्यांना हे डाग तात्काळ दिसतात आणि ते स्वच्छ करणं सोपं होतं.
सफेद चादर पाहून ग्राहकांनादेखील त्या स्वच्छ असल्याचे दिसते.