आयसीसी वनडे वर्ल्ड कपची सुरुवात 1975 रोजी झाली होती. आतापर्यंत 13 वेळा वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यात 6 संघांना वर्ल्ड कप जिंकण्यात यश आलं आहे.
ऑस्ट्रेलिया ही आतापर्यंत ODI वर्ल्ड कपची सर्वात यशस्वी टीम असून त्यांनी आतापर्यंत 6 वेळा विजेतेपद पटकावले आहे.
आतापर्यंत भारत आणि वेस्टइंडीजने दोन - दोन वेळा ODI वर्ल्ड कप जिंकला असून इंग्लंड पाकिस्तान आणि श्रीलंका यांना एकदा वर्ल्ड कप जिंकता आला आहे.
ODI वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया टीमने आतापर्यंत सर्वाधिक सामने जिंकेल आहेत.
मात्र अशा काही देशांच्या टीम आहेत ज्यांना वर्ल्ड कपचं विजेतेपद तर सोडाच पण संपूर्ण ODI वर्ल्ड कपमधील एकही सामना जिंकण्यात यश आलेले नाही.
या यादीत पहिलं नाव स्कॉटलंड या टीमचे असून 1999, 2007 आणि 2015 दरम्यान ते स्पर्धेत सहभागी झाले होते . मात्र तिन्ही वेळा ते ग्रुप स्टेजमधून बाहेर पडले.
स्कॉटलंडने वनडे वर्ल्ड कपमध्ये एकूण 14 सामने खेळले परंतु त्यांना सर्व सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला.
नामीबिया ही एक अशी टीम आहे ज्यांनी 2003 मध्ये ODI वर्ल्ड कपमध्ये सहभाग घेतला होता. मात्र त्यात ते एकही सामना जिंकू शकले नाहीत.
बरमुडा देशाच्या टीमने 2007 मध्ये प्रथमच ODI वर्ल्ड कपमध्ये सहभाग घेतला होता. त्यांनी एकूण 3 सामने खेळले यात मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
ईस्ट आफ्रिकाने 1975 मध्ये झालेल्या पहिल्या ODI वर्ल्ड कपमध्ये सहभाग घेतला, मात्र त्यांनी खेळलेल्या तीनही सामन्यात ते पराभूत झाले.